‘लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱया’

लंडन येथील सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा’ या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये ‘मोऱया’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा ‘प्रीमियर शो’ झाला. या खास या शोसाठी उपस्थित असलेले जितेंद्र बर्डे म्हणाले, ‘‘आपण जन्माला घातलेल्या कलाकृतीला प्रेक्षक आपले म्हणतात आणि तो विचार, ती कलाकृती स्वतःसोबत घेऊन जातात हा विलक्षण अनुभव मी इथे अनुभवला आहे.’’ अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला ‘उत्कृष्ट चित्रपटा’चा बहुमान मिळाला आहे. ‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ निर्मित ‘मोऱया’मध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, रुद्रम बर्डे, कुणाल पुणेकर आणि जितेंद्र बर्डे यांनी काम केले आहे. या चित्रपटात सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा ‘मोऱया’ ऊर्फ सीताराम जेधेंचा थक्क करणारा जीवनप्रवास 8 डिसेंबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.