सोरतापवाडीत वाहनाच्या धडकेत पादचारी तरुण ठार

अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या धडकेत रस्त्याने पायी चाललेला तरुण ठार झाला. हा अपघात शनिवारी पुणे-सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत झाला आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी वीरभद्र रेड्डी (30, रा. कुंजीरवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हरी रेड्डी (26) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी यांचा भाऊ बालाजी हे शनिवारी सकाळी पुणे-सोलापूर रस्त्यावरून पायी जात होते. त्यावेळी सोरतापवाडी परिसरात बालाजी यांना अज्ञात भरधाव वाहनाने जोरात धडक दिली. त्यामुळे बालाजी हे गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक न थांबता पळून गेला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार तपास करत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या