सफरचंदच नव्हे तर साली पण आहेत आरोग्यदायी, वाचा खास टिप्स

apple

An apple keep away doctor अशी इंग्रजीत म्हण आहे. खुपवेळा आपण सफरचंद तसेच खातो किंवा काही लोक सफरचंद सोलून खातात. पण सफरचंद इतकेच त्याच्या सालीही आरोग्यदायी असतात. त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, प्रथिने, फायबर मोठ्या प्रमाणात असतात.

सफरचंद सालीसकट खाल्यास वजन कमी होण्यास मदत होते. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात. फायबर पोटात गेल्यामुळे लवकर भूक लागत नाही. जास्त न खाल्याने वजन वाढत नाही.

सध्या कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्तिचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.  सफरचंदाच्या सालींमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कारण सफरचंदाच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी असते.

हृदय विकार असलेल्यांसाठी सफरचंदाच्या साली फायदेशीर असतात. सफरंचद सालीसकट खाल्यास हृदय स्वस्थ राहते.

सफरचंदाच्या साली खाल्ल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. तसेच एका संशोधनानुसार महिलांनी दररोज सफरचंदाच्या सालीचे सेव केल्यास मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

आपली प्रतिक्रिया द्या