पेण – तीन शासकीय कार्यालयांतही कोरोनाचा शिरकाव

408
corona-new

पेण तालुक्यामध्ये सध्या कोरोनाचा आलेख वाढतच आहे. 19 जुलैपर्यंत पेण तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 273 होती तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 163 आहे. तसेच गुरुवार पर्यंत 8 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा शिरकाव आत्ता पेण तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा झाला आहे. भूमी अभिलेख कार्यालयात, नगरपालिका कार्यालयात व पोलीस स्थानकात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पेण येथील भूमी अभिलेख कार्यालय व नगरपालिका कार्यालय 4 दिवसांकरिता बंद करण्यात आले आहेत. यादरम्यान सदरच्या कार्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

नगरपालिकेतील आस्थापना विभाग वगळता इतर विभागाचे कामकाज सोमवारपासून सुरू होणार आहे अशी माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली. तसेच भूमि अभिलेख कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून सदरचे कार्यालय मंगळवारपासून सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. अशी माहिती भूमी अभिलेख अधिकारी सुजित जाधव यांनी दिली. पेण पोलीस स्थानकातील एका कर्मचार्‍याचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तसेच एका पोलीस अधिकार्‍यालाही कोरोना ची बाधा झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या