अल्पवयीन विद्यार्थीनीची आत्महत्या, वरसई आश्रम शाळेतील 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

738

पेण तालुक्यातील वरसई येथील आदिवासी आश्रम शाळेतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने घेतलेल्या गळफास प्रकरणी शाळेतील 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच सदर आत्महत्याग्रस्त मुलीच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरती प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी दिली.

पेण तालुक्यातील वरसई येथील आदिवासी आश्रम शाळेतील दहावीत शिकणारी 16 वर्षीय मुलगी बुधवारी वसतिगृहातून बेपत्ता झाली होती. तशी तक्रार वस्तीगृह प्रशासनाने पोलिसात दाखल केली होती. सदर मुलीचा मृतदेह झाडाला फास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळला. यासंदर्भात प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी सदर शाळेतील मुख्याध्यापक डी.जी. पाटील, प्राथमिक शिक्षिका उषा लक्ष्मण पवार व अधीक्षिका दुर्गा गजानन धंदरे यांना तातडीने निलंबित करण्याची कारवाई केली आहे.

सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाचा करिता जे. जे. रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर ही हत्या की आत्महत्या हे कळेल व दोषींवर अधिक कारवाई करण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या