मुरुड ग्रामपंचायतीच्या कारभाराचे विशेष लेखापरिक्षण करण्याची मागणी

सामना प्रतिनिधी  । लातूर

तालूक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुरुड ग्रामपंचायतीच्या कारभाराचे विशेष लेखापरिक्षण करण्यात यावे अशी मागणी काही नागरिकांनी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे  या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. अक्टोंबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीतील कारभाराचे विशेष लेखापरिक्षण करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात नमूद केले असून,  ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पध्दतीने करण्यात येत आहे. तसेच सदस्यांना अपमानास्पद वागूणक देण्यात येत आहे असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.