कोरोना काळात हृदयविकार, न्यूमोनियामुळे सर्वाधिक मृत्यू

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार (सीव्हीडी) व उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांबद्दल समाजात जागरूकता कमी आहे, हे आताच्या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा देशातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि उच्च रक्तदाबामुळे या आजाराची जोखीम वाढते असे एका अभ्यासातून पुढे आले आहे.

जागतिक हृदय दिनानिमित्त हे सर्वेक्षण केले होते. कोरोनाच्या काळात हृदयविकार गंभीर झालेल्या रुग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.  कोरोनामुळे केवळ श्वसनसंस्था व फुफ्फुस यांच्यावरच परिणाम होतो असे नाही, तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीची यंत्रणाही खालावते असे अपोलो हॉस्पिटल्स इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजीचे सल्लागार डॉ. राहुल गुप्ता यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या