जालन्यात रस्त्यांवर शुकशुकाट; बाजारपेठेत मात्र गर्दी

313

कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. तब्बल 45 दिवसांनंतर काही प्रमाणात जालना शहरात खरेदी-विक्री व बाजारपेठ सुरु झाल्याने नागरिकांनी सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर दुसरीकडे शहराबाहेरील रस्ते आणि अंतर्गत महत्वाच्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. लॉकडाऊनच्या काळातही दोन ते तीन दिवसांपासून बाजारपेठेतील काही दुकाने सुरू असल्याने सकाळी खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या फैलावाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जालन्यामध्ये रस्त्यांवर शुकशुकाट असला तरी बाजारपेठेत मात्र गर्दी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या