लॉकडाऊन असतानाही गंगाखेडमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

316

लॉकडाऊनच्या नियमांचे आणि परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन गंगाखेड शहरात होत नसल्याचे दिसून आले आहे. जिवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने सुरू आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे जथ्ये खरेदीसाठी येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणाच नागरिक एकत्र येत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. महसूल, नगर परिषद आणि पोलीस प्रशासन नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाउन सुरू असून परभणीशेजारी असलेल्या नांदेड व हिंगोली जिल्हात रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यात आलेली नाही. शहरातील कापड, सराफा, सलून भांडी, इलेट्रानिक्स जनरल स्टोअर्स व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. तरीही लॉकडाउन असतानाही शहरातील भांडी,फूटवेअर, कापड,हार्डवेअर,टेलर्ससह काही दुकाने बाहेरून बंद असून आतून सुरू आहेत. तसेच दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू असलेल्या जिवनावश्यक वस्तूंसह भाजी मार्केट खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्यावर होत आहे. पोलिसांची गस्तीची जीप येताच नागरिक गल्लीबोळात जातात. त्यानंतर परत रस्त्यावर येतात. शहरात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. नगर परिषद व महसूल प्रशासनाचे कर्मचारी होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या