मस्तवाल पाशा पटेलांवर कारवाई करण्याची मागणी

34

सामना वृत्तसेवा । पंढरपूर

राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. पटेल यांच्या या कृतीचा पंढरपूरमधील पत्रकारांनी जाहीर निषेध केला. निषेधाचे निवेदन तसेच पाशा पटेल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना दिले.

सत्तेमुळे पाशा पटेल यांना मस्ती आली आहे. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत पंढरपूरच्या पत्रकारांनी तहसीलदार कार्यलयात पाशा पटेल यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी पाशा पटेल यांना राज्य कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदावरुन काढून टाकावे, अशी मागणी पत्रकारांनी केली.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, सुनिल उंबरे, सुनिल दिवाण, शिवाजी शिंदे, नवनाथ पोरे, महेश भंडारकवठेकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन डावरे, शंकर कदम, नितीन शिंदे, अतुल बडवे, राजाभाऊ शहापूरकर, भारत नागणे, भगवान वानखेडे, सचिन कसबे, मंदार लोहकरे, समाधान गायकवाड, प्रभु पुजारी, विनायक हरिदास, संकेत कुलकर्णी, प्रविण नागणे, बजरंग नागणे, महालिंग दुधाळे, राजेंद्र कोरके, सागर आतकरे, नागनाथ सुतार, चैतन्य ताठे, मोहन कोळी, सतिश बागल, सचिन झाडे, संतोष रणदिवे, अतुल फराटे, संग्राम जाधव, विक्रम कदम आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या