नोट नव्हे आता जनता पंतप्रधानच बदलणार – नाना पटोले

केंद्रातील मोदी सरकारने आधी पाचशे व एक हजाराची नोट बंद केली. आता दोन हजारांची नोट बंद करण्यात आली आहे. आधीच्या नोटाबंदीच्या वेळी बँकेच्या बाहेर रांगेत उभ्या असलेल्या अनेकांचा मृत्यू झाला. स्वतःला विश्वगुरू म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेशी खेळत असून सर्वसामान्य जनता त्यास वैतागली आहे. ही संतप्त जनता आता नोट नव्हे, तर पंतप्रधानच बदलेल, अशी जबरदस्त टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार मग रस्त्यांची अवस्था वाईट का?

कल्याण व डोंबिवलीतील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने जनतेला चालताही येत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा या भागाचा खासदार आहे. मात्र या शहरांची अवस्था इतकी वाईट का, असा सवालही त्यांनी केला.