पालिकेचे पार्किंग मोबाईल ऍपवर, 500 मीटरपासून, 5 किमीपर्यंत मार्ग दाखवणार

182

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेचे पार्किंग आता आपल्या मोबाईलमधील ऍपमध्ये समजणार आहे. यासाठी पालिकेने ‘एमसीजीएम 24 ऑ 7’ वर ‘पार्किंग मॉडेल’ विकसित केले असून यामध्ये 500 मीटरपासून 5 किमीपर्यंत असलेल्या पार्किंगची माहिती आणि मार्ग या ऍपवर समजणार आहे. आजपासून पालिकेची ही सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्त  प्रवीण परदेशी यांनी बेकायदा पार्किंगविरोधात कठोर कारवाई करण्याचे  निर्देश दिले आहेत. यामध्ये पालिकेची पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणापासून 500 मीटरच्या आत बेकायदेशीरपणे गाडी पार्क केल्यास 10 हजारांपर्यंत दंड केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांना पालिकेच्या उपलब्ध पार्किंगच्या ठिकाणांची माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी यासाठी ‘पार्किंग मॉडेल’ विकसित करण्यात आल्याची माहिती पालकेच्या मुंबई वाहनतळ प्राधीकरणाकडून देण्यात आली. याबतची सुविधा पालिकेच्या 26 सार्वजनिक वाहनतळांसह ‘बेस्ट’च्या अखत्यारितील वाहनतळांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

म्हणूनच घेतला निर्णय

पालिका क्षेत्रातील काहनतळ विषयक बाबींमध्ये अधिकाधिक सुसूत्रता आणण्यासाठी ‘बृहन्मुंबई महापालिका विकास आराखडा 2034’ मधील तरतुदींनुसार ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ गठित करण्यात आले आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून पार्किंगबाबत अभ्यास आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये आता ‘एमसीजीएम 24 ऑ 7’ अँड्रॉइड ऍपमध्ये ‘पार्किंग मॉडेल’ विकसित करण्यात आले आहे. मोबाईलवरील प्ले-स्टोअरमधून ‘एमसीजीएम 24 ऑ7’ हे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. हे ऍप आधीच डाऊनलोड केले असेल तर ते अपडेट करावे लागणार आहे.

पार्किंगची सद्यस्थिती समजणार

पार्किंग ऍपवरील ‘डायरेक्शन लिंक’वर क्लिक केल्यानंतर वाहनचालकांना पार्किंग ठिकाणावर सध्या किती पार्किंग उपलब्ध आहे, ठिकाणाचा पत्ता, कामकाजाची केळ, काहनतळाची क्षमता अशा माहितीचा समाकेश असेल. विशेष म्हणजे सदर वाहनतळ सशुल्क असल्यास किती कालाकधीसाठी किती शुल्क आकारले जाईल, याचीही माहितीही दिसेल.

आपली प्रतिक्रिया द्या