प्रत्येक देशाच्या सहा अधिकाऱ्यांना ऑलिम्पिक उद्घाटनासाठी परवानगी

शुक्रवारी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रत्येक देशाच्या फक्त सहा अधिकाऱयांना परवानगी देण्यात आली आहे. याचबरोबर दुसऱया दिवशी जे खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत त्यांना उद्घाटन सोहळ्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. हिंदुस्थानी पथकाचे उपप्रमुख प्रेम कुमार वर्मा यांनी ही माहिती दिली.

टोकियो आलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 127 खेळाडू सहभागी होणार असून इतर अधिकारी, प्रशिक्षक व सहयोगी स्टाफ असे एकूण 228 जणांचे हिंदुस्थानी या स्वारीवर आलेले आहेत. मिशनप्रमुखांच्या बैठकीनंतर बोलताना प्रेम कुमार वर्मा म्हणाले, ऑलिम्पिकच्या उद्घाटनासाठी प्रत्येक देशाच्या सहा अधिकाऱयांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आलेली नाही. मात्र तरीही जे खेळाडू दुसऱया दिवशी स्पर्धेत सहभागी होणार आहेत, त्यांनी उद्घाटन सोहळ्यात सहभागी न होता आपल्या खेळावर लक्ष पेंद्रित करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे दुसऱया दिवशी स्पर्धा असणाऱयांनी या सोहळ्यात सहभागी होऊ नये, असे सांगण्यात आले आहे. नेमबाजी, बॉक्सिंग, तिरंदाजी याचबरोबर पुरुष व महिला हॉकी संघांना उद्घाटनच्या सोहळ्याच्या दुसऱया दिवशी स्पर्धेत काwशल्य पणाला लावायचे आहे. पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि सहा वेळची जगज्जेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हे दोन खेळाडू ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानी पथकाचे ध्वजवाहक असणार आहेत. मेरी कोमला उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच दुसऱया दिवशी स्पर्धेत खेळायचे नाही. मात्र मनप्रीत सिंगला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानचे नेतृत्व करायचे आहे. त्यामुळे मनप्रीतवर थोडा ताण असेल. याचबरोबर जे खेळाडू विलगीकरणात आहेत त्यांनाही उद्घाटन सोहळ्यात सहभागी होता येणार नाही, अशी माहितीही प्रेम कुमार वर्मा यांनी दिली.

15 देशांचे नेते राहणार उपस्थित

कोरोनाच्या संकटातही होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात जवळपास 15 देशांचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सोहळ्यात एक हजाराच्या दरम्यान लोकसंख्या असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितीला कात्री लावण्यात आली आहे, अशी माहिती जपानचे मुख्य पॅबिनेट सचिव कात्सुनोबू केटो यांनी दिली. फ्रान्सचे राष्ट्रपती इमानुएल मेक्रो, मंगोलियाचे पंतप्रधान लुवसानामसराई ओयून एर्डेन व अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडेन यांच्यासह काही परदेशी नेत्यांनी ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर अनेक परदेशी नेत्यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे टोकियोची वारी रद्द केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या