पश्चिम बंगालमध्ये एक कोटी रुपयांच्या विदेशी सिगरेट्स जप्त, एकाला अटक

4

सामना ऑनलाईन । कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये महसुल विभागाने एका व्यक्तीला तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तसेच आरोपीकडून लाखो सिगरेट्स जप्त केल्या आहे. सदर अरोपी मूळचा बिहारचा रहिवासी असून त्याला सिलिगुडीमध्ये अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीकडून 10 लाख 43 हजार 400 विदेशी सिगरेट्स जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत तब्बल एक कोटी पाच लाख रुपये आहे. आरोपी बिहारमधून कोलकाताला जात असताना अटक केली.