दारू पिण्यासाठी पैसे नाही दिले, तरूणाचे डोके फोडले

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे दोघांनी एका तरूणाला जबर मारहाण केल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी संतोष आव्हाळ यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अजय कावडे (रा. वाघोली) व त्याच्या साथीदाराच्या विरोधात  लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळ  वाघोलीतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी कावडे याने दारू पिण्यास पैशाची मागणी केली. त्याने पैसे न दिल्याचा राग आला. त्यामुळे आरोपीने साथीदारासोबत तक्रारदार यांना शिवीगाळ करून डोक्यात मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी लोणीकंद पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या