50 लाखांचा विमा मिळावा म्हणून ‘त्याने’ दिली स्वतःच्या हत्येची सुपारी

560

राजस्थानच्या भिलवाडा येथे एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाला 50 लाखांची विम्याची रक्कम मिळावी म्हणून स्वत:च्याच हत्येची सुपारी दिली. राजस्थानच्या भिलवाडा येथील मंगरोप येथे पोलिसांना बलबीर नावाच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. त्याबद्दल पोलिसांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा मृतदेह सापडला तेव्हा त्याचे हात व पाय विद्युत ताराने बांधलेले होते. त्याचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. त्याने त्याच्या हत्येसाठी दोन जणांना 80 हजारांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुनील यादव आणि रघुवीर या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलवीर यांच्या डोक्यावर 20 लाखांचे कर्ज होते. त्याने ही रक्कम इतरांकडून घेऊन दुसऱ्या लोकांना व्याजावर दिली होती. मात्र त्याने इतरांना उसण दिलेल्या रक्कमेवर त्याला मूळ रक्कम मिळत होती, परंतु व्याज मिळत नव्हते. यामुळे त्याने अस्वस्थ होऊन स्वतःचा 50 लाखांचा अपघाती विमा काढला. त्याने 8 लाख 43 हजार 200 रुपये प्रीमियमही भरला होता. विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने सुनील यादव याला स्वतःच्या हत्येची सुपारी दिली. बालवीर याने सुनील यादव याला दुचाकीवर स्वतःची हत्या करण्यासाठीचे ठिकाण दाखवले. यानंतर सुनील यादव आणि रघुवीर यांनी बलवीर याची त्याने सांगितल्याप्रमाणे हत्या केली. बलवीरची इच्छा होती की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना हे पैसे मिळावेत. या पैशातून त्याचे कुटुंबीय त्यावरील कर्ज फेडून उर्वरित पैशातून आपले जीवन आरामात व्यतीत करू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या