देता छप्पर फाडके… 100 रुपयांत पालटले मजुराचे आयुष्य

देने वाला जब भी देता, देता छप्पर फाडके अशी हिंदी उक्ती आहे. पंजाबमध्ये एका मजुराच्या आयुष्यात ही ऊक्ती खरी ठरली आहे. 100 रुपयांत या मजुराचे भाग्य पालटले असून एका रात्रीत तो कोट्यधीश झाला आहे.

पंजाबमध्ये बोधराज हा व्यक्ती मजूरीवर काम करत होता. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तेव्हा त्यांने लॉटरी विक्रेत्याकडून 100 रुपयांत एक लॉटरीचे तिकीट विकत घेतले. या तिकिटाचे बक्षीस एक कोटी रुपये होते.

14 एप्रिल रोजी या लॉटरीची सोडत निघाली आणि एका दिवसात बोधराज कोट्यधीश झाले. बोधराज यांना एक कोटी रुपयांची लॉटरी लागली. त्यामुळे बोधराज आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  बोधराज यांना दोन मुली आहेत. दोघींना पण उच्चशिक्षण देणार अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली.

आपली प्रतिक्रिया द्या