खून करून त्याने घेतला मृतदेहासोबत सेल्फी

28

सामना ऑनलाईन । रांची

छत्तीसगढमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. एका माणसाने खून केल्यानंतर मृतदेहासोबत फोटो काढून तो व्हायरल केल्याने खळबळ माजली आहे. रायगढ येथील ही घटना असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना २०१६ मधली आहे. जीवन यादव (२१) नामक व्यक्तीने २१ मे २०१६ महिन्यात निलेश जयस्वाल नावाच्या माणसाची हत्या केली होती. निलेशच्या दुकानात जीवन चोरी करण्यासाठी गेला होता. चोरी करताना पकडलं गेल्यामुळे जीवनने निलेशची हत्या केली. हत्येनंतर निलेशच्या मृतदेहासोबत सेल्फी काढून त्याने तो व्हायरल केला.

विशेष म्हणजे, हत्येनंतर जीवन निलेशच्याच घरात लपून बसला होता. हा सेल्फी व्हायरल झाल्यामुळे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं झालं. त्यांनी या सेल्फीच्या आधारे जीवनला बेड्या ठोकल्या.

आपली प्रतिक्रिया द्या