वीर्याने भरलेले इंजेक्शन महिलेला टोचवले, आरोपीला 10 वर्षांचा तुरुंगवास

किराण्याच्या दुकानामध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेवर एकाने वीर्याने भरलेल्या इंजेक्शनने हल्ला केला. सदर व्यक्तीने हे वीर्याने भरलेले इंजेक्शन महिलेला टोचवले. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अमेरिकेमध्ये ही घटना घडली आहे.

मेरिलँड येथील सुपरमार्केटमध्ये केटी पीटर्स नावाची एक महिला किराणा सामाना खरेदी करण्यासाठी आली होती. या दरम्यान थॉमस ब्रायन स्टेमन नावाच्या एका व्यक्तीने महिलेला वीर्याने भरलेले इंजेक्शन टोचवले होते. इंजेक्शन टोचवल्यानंतर महिलेला वेदना होतात तेव्हा थॉमस तिच्या बाजूलाच उभा राहतो आणि काही झालेच नाही अशा अदिर्भावामध्ये मला माहिती आहे हे मधमाशी चावल्यासाखेच आहे, हो ना? असे म्हणतो.

हा सर्व प्रकार सुपरमार्केटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद होतो. यानंतर पोलीस आरोपीला अटक करतात. आरोपी थॉमसच्या कारमध्ये असे अनेक इंजेक्शन पोलिसांना सापडतात. यानंतर पोलीस त्याला न्यायालयासमोर उभे करतात. येथे 18 महिने खटला चालल्यानंतर न्यायाधीश आरोपीला 10 वर्षांची शिक्षा ठोठावतात.

दरम्यान, सुपरमार्केटमध्ये घुसल्यानंतर थॉमस आपल्याशी घडकतो आणि त्यावेळी काहीतरी टोचल्यासारखे जाणवल्याचे पीडित महिला सांगते. घरी जावून पाहिले असता इंजेक्शन टोचवल्यानंतर जशी खूण होते तशीच त्या जागी झाल्याचे दिसले. संशय आल्याने आपण सुपरमार्केटमध्ये जावून सीसीटीव्ही तपासले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे पीडित महिला केटी सांगते. ‘द सन’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या