कॉलेजमध्ये ड्रग्स विकण्यासाठी जबरदस्ती केल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

कॉलेजमध्ये ड्रग्स विकण्यासाठी जबरदस्ती केल्याने एका बारावीच्या विद्यार्थ्याने लोकलखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली आहे. साईनाथ चलवाडी, मुरगन मिशेल, अनिकेत गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असून हे तिघेही २० ते २२ वयोगटातील आहेत.

कनिष्ठ जातीची असल्याने सासरच्यांकडून छळ, तरुणीची आत्महत्या

गेल्या शुक्रवारी मोहम्मद झैन या बारावीतील विद्यार्थ्यांने अंबरनाथ जवळी रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली येऊन आत्महत्या केली. याप्रकरणी झैनचे वडील झाकीर यांनी कुणीतरी तीन जणं झैनला त्रास देत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर झैनचा चुलत भाऊ ज्याला झैन त्याची सर्व गुपितं सांगायचा त्याने पोलिसांना साईनाथ चलवाडी, मुरगन मिशेल, अनिकेत गायकवाड हे झैनला कॉलेजमध्ये ड्रग्स विकण्यासाठी जबरदस्ती करत होते. त्यासाठी ते त्याला त्रासही देत होते असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्यांची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बॉलिवूडमधील डान्सर अभिजीत शिंदेची आत्महत्या

काही दिवसांपूर्वीच झैनने वडिलांकडे केलेली तक्रार
झैनने काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांकडे काही मुलं त्याला त्रास देत असल्याची तक्रार केली होती. मात्र ईद दोन दिवसांवरच येऊन ठेपल्याने झैनच्या वडिलांना सण झाल्यानंतर पोलिसांत तक्रार करू असे झैनला सांगितले. ईदनंतर बासी ईद साजरी करण्यासाठी झैनचे कुटुंबीय मुंबईला गेले होते. तेथून शुक्रवारी परतत असताना झैनने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली.

summary : Pestered to sell drugs, teen kills self