मालकिणीचा जीव वाचवण्यासाठी टायगरची बिबट्याशी झुंज.

810

सामना ऑनलाइन

कुत्र्याच्या प्रामाणिकपणा बद्दल आपण बर्‍याच कथा वाचल्या किंवा ऐकल्या असतील. कित्येक वेळा कुत्रा स्वत:चा जीव धोक्यात घालुन आपल्या मालकाचा जीव वाचवतो. अशीच एक घटना 14 ऑगस्ट रोजी दार्जिलिंग येथे बुधवारी घडली आहे. टायगर असे या कुत्र्याचे नाव आहे.

पश्चिम बंगालमध्ये एका कुत्र्याने बिबट्याशी झुंज देत आपल्या मालकिणीचा जीव वाचवला. 14 ऑगस्ट रोजी दार्जिलिंगमध्ये ही घटना घडली. बुधवारी अरुणा लामा आपल्या मुलीसोबत घरी जात असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. आपल्या मालकिणीवर हल्ला होत असल्याचे पाहुन टायगरने बिबट्याच्या अंगावर झेप घेतली. कुत्र्याच्या आक्रमकतेपुढे बिबट्या घाबरला आणि त्याने तिथून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात अरुणा किरकोळ जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या