केरळच्या श्वानाला कश्मीरचे स्थळ

सध्या सोशल मीडियावर एका वराचा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. केरळमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या लाडक्या श्वानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यासाठी योग्य वधू असल्यास सांगा, असे आवाहन केले आहे. या श्वानाने चक्क गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला असून सफेद रंगाची पारंपरिक लुंगी नेसली आहे.

या फोटोवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता तर या श्वानाला स्थळदेखील  यायला सुरुवात झाली आहे. बिस्मा अली या कश्मीरमधील महिलेने आपल्याकडे सुयोग्य वधू असल्याचे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या