शहरी माओवाद्यांच्या अटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका, राजकारण पेटलं

51
supreme-court

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नक्षलवाद्यांशी संपर्कात असल्याच्या माहितीवरून 5 संशयित शहरी माओवादी विचारांच्या अभासकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकीकडे दलित पक्ष, मार्क्सवादी पक्ष, काँग्रेस यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. रोमिला थापर, प्रभात पटनायक, सतीश देशपांडे, माया दर्नाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून आज दुपारी 3:45 मिनिटांनी यावर सुनावणी होणार आहे.

#BhimaKoregaon Eminent persons Romila Thapar, Prabhat Patnaik, Satish Deshpande, Maya Darnall and one other person move the Supreme Court against the arrest of activists Sudha Bhardwaj and activist Gautam Navlakha. SC to hear the matter at 3:45 pm today.

याशिवाय गौतम नवलाख प्रकरणी दिल्ली उच्चन्यायालयात दुपारी 2:15 वाजता सुनावणी होणार आहे. पोलिसांनी आपल्याकडे असलेले मराठी कागदपत्र इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी वेळ मागितला आहे. न्यायालयाने पोलिसांची बाजू मांडणाऱ्या वकिलास ही कागदपत्र दुपारी 12 पर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, ‘आरएसएस’ ही देशात आता एकमेव स्वयंसेवी संस्था उरली आहे. बाकीच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि तक्रार करणाऱ्यांना गोळ्या घाला, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. तर नक्षल समर्थकांवरील कारवाई लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या