आमच्या समोर ‘धर्मसंकट’, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री सीतारामन यांचे वक्तव्य

देशात इंधन दरवाढीचा दरदिवशी नवीन विक्रम घडताना दिसत आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ‘देशातील ग्राहकांची अडचण आम्ही समजतो, मात्र याबाबतीत सरकार समोर मोठ्या ‘धर्मसंकट’सारखी परिस्थिती आहे.’ त्या म्हणाल्या, ‘देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे अनेक संकेत मिळत आहेत.’

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन म्हणल्या, ‘आम्ही हिंदुस्थानातील तरुणांवर लक्ष केंद्रित करत आहोत, जे आम्ही अर्थसंकल्पातही केलं. दुसरीकडे, कोरोना कालावधीत महसूल संकलनातील कमतरता पाहता सरकारला कर कमी करणे देखील फार अवघड आहे.’

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का?

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी सीतारामन यांना विचारला असता त्या म्हणल्या की, ‘याबाबत जीएसटी परिषद यावर विचार करू शकते.’

आपली प्रतिक्रिया द्या