मुंबईत डिझेलही शतकाच्या उंबरठ्यावर, पेट्रोलचे दर पुन्हा भडकले

संपूर्ण देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून या दरांनी रोज नवे उच्चांक प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी म्हणजेच 10 जुलै रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 35 पैशांची तर डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ केली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.93 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. मुंबईत डिझेलचा दर शनिवारी 97.46 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.

दिल्लीत पेट्रोलचा दर 100.91 रुपये प्रति लिटर झाला आहे. तिथे डिझेलचा दर शनिवारी 89.88 रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पेट्रोल 109.24 रुपये लिटर दराने विकलं जात आहे. भोपाळमध्येच डिझेल हे 98.67 रुपये झालं आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिसा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लडाख आणि सिक्कीम या राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. राजस्थान, ओडिसा, मध्य प्रदेशाच्या काही भागात डिझेलनेही शंभरी पार केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या