पेट्रोल पंप मालकांना पेट्रोलियम मंत्र्यांनी झापले

21

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा देणाऱ्या पंप मालकांना पेट्रोलियम मंत्र्यांनी ट्विट करुन झापले. मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करुन पंप मालकांना पंप बंद ठेवू नका असे बजावण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये देशाला इंधनाच्या आयातीपासून मुक्त करण्याची गरज बोलून दाखवली. इंधनाची आयात कमी व्हावी यासाठी नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस पेट्रोल किंवा डिझेल वापरू नये अशा स्वरुपाचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. मात्र या आवाहनाचा अर्थ आठवड्यातील एक दिवस पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा पुरवठा बंद करणे असा होत नाही. पंप मालकांनी रविवारी पंप बंद ठेवू नये असे पेट्रोलियम मंत्रालयाने ट्विट करुन सर्व पंप मालकांना सांगितले आहे. या प्रकरणी पंप मालकांच्या संघटनेशी चर्चेची तयारी असल्याचेही पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केले आहे. कमिशन वाढवून मिळावे यासाठी पंप मालकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचा गैरफायदा घेऊ नये असे पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमधले पेट्रोल पंप मालक मे महिन्यापासून दर रविवारी पंप बंद ठेवण्याच्या तयारीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या