सांताक्रूझ-चेंबूर लिंकरोड विस्ताराचा पहिला टप्पा फेब्रुवारीपासून खुला होणार

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. हे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून, यातील पहिला टप्पा हा फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कलिना, वांद्रे कुर्ला संकुल आणि कुर्ला बस स्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. वाकोला उड्डाणपुलाचा भाग हा दुसऱ्या टप्प्यात येत असून उड्डाणपुलाचा हा भाग जून महिन्यापर्यंत खुला केला जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ग्रँड हयात हॉटेल ते अहमद रझा चौक आणि वांद्रे कुर्ला संकुल ते एळबीएस जंक्शनपर्यंचात SCLR विस्ताराचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी चालू केला जाईल.