नैसर्गिक आपत्तींमध्येही सुरक्षित राहणार ‘हे’ शहर

85

सामना ऑनलाईन । मनीला

नैसर्गिक संकटांचा कोणताही धोका नसलेले एक शहर फिलीपाइन्समध्ये उभारण्यात येत आहे. राजधानी मनीलापासून १०० किलोमीटर अंतरावर ‘न्यू क्लार्क सिटी’ उभी राहत आहे. महापूर, वादळ, भूकंप आणि ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक संकटांमध्येही हे शहर सुरक्षित राहणार आहे. या शहराला बॅक सिटी असेही म्हणण्यात येत आहे. सुमारे ९५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या शहरात १२ लाख लोक राहू शकणार आहेत. २६ लाखांची लोकसंख्या असलेले फिलीपाइन्स प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ च्या क्षेत्रात येते. अशा भागात ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचा आणि भूकंपाचा सर्वाधीक धोका असतो.

या शहरात वाहनांपासून होणारे प्रदूषणही कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त भाग पायी चालण्यासाठी बनवण्यात आला आहे. वाहनांचा वापर कमी होईल अशाप्रकरे वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार आहे. शहर निर्मितीचे काम पाच टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १३ हजार ७७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे बॅक सिटी प्रकल्पाचे प्रमुख विर्विसियो डिजोन यांनी सांगितले.

शहरात उर्जानिर्मितीसाठी ग्रीन एनर्जी, सौर उर्जा आणि नैसर्गिक वायूंचा वापर करण्यात येणार आहे. कचऱ्यापासून उर्जा निर्मितीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. उर्जेचा कमीतकमी वापर होईल अशाप्रकारे इमारती उभारण्यात आल्या आहेत. परिसरातील नैसर्गिक गोष्टी नदी, पहाड, डोंगर, दऱ्या, झाडे यांचे कोणतेही नुकसान न करता शहर उभारण्यात येत आहे. मनीलापेक्षा हे शहर जास्त उंचावर वसवण्यात येत आहे. त्यामुळे पूराचा धोक्यापासून शहराचे रक्षण होणार आहे. या शहराच्या चार बाजूंना डोंगर आहेत. त्यामुळे वादळापासून शहराचे रक्षण होणार आहे. इमारतींच्या बांधकामात कॉन्क्रीटसह ज्वालामुखीतून निघालेल्या खडक, मातीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील घरे ज्वालामुखीची उष्णता सहन करतील या क्षमतेची बनवण्यात आली आहेत. फिलीपाइन्सला चक्रीवादळ, भूकंप आणि ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्तींचा सवार्धीक धोका आहे. वषर्भरात फिलीपाईन्सला सुमारे १९ चक्रीवादळचा सामना करावा लागतो. त्यामुळे या नैसर्गिक संकंटांचा विचार करून त्या आपत्तींमध्यही शहराचे रक्षण नैसर्गिक गोष्टीच करतील, अशा प्रकारे शहराची उभारणी करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या