निवडणूक चिन्हांत आता फोन चार्जर, पेन ड्राइव्ह

राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष, तसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता 48 ऐवजी 190 मुक्त चिन्हे निश्चित केली आहेत. विशेष म्हणजे या निवडणूक चिन्हांत आता फोन, चार्जर आणि पेन ड्राइव्हचाही समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील ग्रामपंचायती वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीकर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते. राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण 16 पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय तर आठ इतर राज्यांतील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 244 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे.

या पक्षांची निवडणूक चिन्हे राज्यातही आरक्षित

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा), भारतीय जनता पार्टी (कमळ), नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (घड्याळ), भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सकादी (हातोडा, विळा क तारा), बहुजन समाज पक्ष (हत्ती), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात) या राष्ट्रीय पक्षांसाठी आणि शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्के इंजिन) या महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांसाठी, तसेच जनता दल सेक्युलर (डोक्याकर भारा घेतलेली स्त्री), समाजवादी पार्टी (सायकल), इंडियन युनियन मुस्लिम लीग (शिडी), लोक जनशक्ती पार्टी (बंगला), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (दोन पाने), जनता दल युनायटेड (बाण), ऑल इंडिया मजलिस हत्तेहदूल मुसलमीन (पतंग) व आम आदमी पार्टी (झाडू) या इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांसाठी संबंधित निवडणूक चिन्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित आहेत, असेही मदान यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या