Photo – जादूची आई सापडली! ‘कान्स’मधील लूकवरून ऐश्वर्या ट्रोल

कान्स सोहळा म्हटला की सगळ्यांना ऐश्वर्या राय बच्चन हिच्या लूक्सबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते. जवळपास 20 वर्षांपासून ती न चुकता कान्समध्ये हजेरी लावत आली आहे. एखाद दुसरा अपवाद वगळता तिच्या लूक्सचं आतापर्यंत प्रचंड कौतुक झालं आहे. पण यंदा मात्र ऐश्वर्या तिच्या लूक्समुळे ट्रोल होताना दिसत आहे. सिक्वेन्स पद्धतीचा आणि अटॅच्ड हुडी असलेला गाऊन तिने परिधान केला आहे. त्यावर सॅटिनचा बो लावलेला आहे. पण, नेटकऱ्यांनी मात्र तिच्या या लूकवर नापसंती दर्शवली असून ‘कोई मिल गया’ या चित्रपटातील जादू या एलियनची आई सापडली असं म्हणत तिच्या लुकची खिल्ली उडवण्यात येत आहे.