Photo – चंद्रमुखी अमृताचा बोल्ड लूक, चमचमत्या ड्रेसमध्ये केलं फोटोशूट

मराठी चित्रपटसृष्टीची चंद्रमुखी अशी ओळख मिळवणारी अमृता खानविलकर सध्या बरीच चर्चेत आहे. बऱ्याच मोठ्या काळानंतर मिळालेला एक मोठा ब्रेक तिने सार्थकी लावला आणि स्वतःच्या नावावर एका हिटची नोंद केली. तीन महिने उलटले तरी या चंद्रमुखीच्या प्रसिद्धीचा फिव्हर काही उतरताना दिसत नाहीये. त्यात अमृताच्या एका नवीन बोल्ड फोटोशूटची भर पडली आह.