Photo – सेलिब्रिटी रंगले धुळवडीच्या रंगात

मंगळवारी देशभरात धुलिवंदनाचा उत्साह दिसून आला. वेगवेगळ्या रंगांनी एकमेकांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यात सेलिब्रिटी कसे मागे पडतील. त्यांनीही आपल्या आप्तेष्ट, मित्रमंडळींसह होळीचा आनंद लुटला.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी धुळवड साजरी केली.
सचिन तेंडुलकर याने रंगांनी खेळताना पुरणपोळीवर ताव मारून धुळवडीचा आनंद लुटला
हिंदुस्थानची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिनेही धुळवड साजरी केली.
बाहुबलीफेम तमन्ना भाटिया हिने देखील धुळवडीचा आनंद लुटला
ब्लीड ब्ल्यू म्हणत मैदानावर उतरणाऱ्या हिंदुस्थानी क्रकेट संघानेही एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी केली