Photo – पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. तिचा गेहराईंया हा चित्रपट ओटीटी माध्यमावर झळकल्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. तिच्या आगामी पठाण या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. फॅशन विश्वातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाने या दरम्यान पुन्हा आपली पावलं फॅशन वीकच्या दिशेने वळवली आहेत. पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाने हजेरी लावली असून त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.