Photo – असेच नाही बनले स्टार्स, जाणून घ्या कलाकारांनी पहिली नोकरी कुठं केली?

jacqueline fernandez

अक्षय कुमार

akshay-kumar

अभिनेता अक्षय कुमारने चित्रपटात काम करण्याआधी बँकॉकमध्ये एका हॉटेलात शेफ आणि वेटरचं काम केलं होतं.

शाहीद कपूर

shahid-kapoor

शाहीद कपूर इंडस्ट्रीत अभिनेता म्हणून येण्याआधी ताल आणि दिल तो पागल है या चित्रपटात बॅकग्राउंड डांसर म्हणून काम केलं होतं.

रणवीर सिंह

ranveer

रणवीर सिंह यानं अभिनेता म्हणून काम करण्याआधी एका जाहिरात कंपनीत कॉपी राइटर म्हणून काम केलं होतं. त्याच्या ऑडिशनचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

रजनीकांत

rajinikanth-5

थलाइवा म्हणून प्रसिद्ध असलेले दक्षिणेतील सुपरस्टार यांनी अभिनेता बनण्याआधी कुली, कारपेंटर आणि बस कंडक्टर म्हणून काम केलं होतं.

जॅकलीन फर्नांडिस

jacklin

श्रीलंकेतील ब्यूटी क्विन जॅकलीन फर्नांडिस एका टीव्ही चॅनलमध्ये रिपोर्टर म्हणून काम करत होती. त्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात पाउल टाकलं.

जॉन अब्राहम

john-abraham

जॉन अब्राहम चित्रपटात येण्याआधी मुंबईतील दोन मीडिया एजंसीमध्ये काम करत होता. त्यानंतर तो मॉडेलिंगमध्ये पुढे आला.

नवाजुद्दीन सिद्दीकी

nawazuddin-siddiqui

नवाजुद्दीन सिद्दीकीने देखील अभिनय क्षेत्रात येण्याआधी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं होतं. त्यानं वॉचमन आणि केमिस्टचं काम केलं होतं.

बोमन इरानी

boman-irani4

बोमन इरानी मुंबईतील एका फाइव स्टार हॉटेलमध्ये सपोर्ट स्टाफ म्हणून काम करत होते. तसेच बेकरीत आपल्या आईला देखील मदत करत होते.

आपली प्रतिक्रिया द्या