1 / 7

सध्या काही हटके नेल आर्टचा ट्रेंड रुजतोय. नेहमीच्या नेलपेंटपेक्षा या नेल आर्ट ट्राय करून तुम्ही ट्रेंडी आणि नखरेल दिसू शकता.

'रेन बो मणी' हे अलीकडच्या काळात जास्त प्रसिद्ध झालेले नेलआर्ट असून त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचा वापर केला जातो. एकाच रंगाऐवजी दहाही नखांना वेगवेगळे रंग दिले जातात.

शाटर्ड ग्लास हे कोरियन पद्धतीचं नेल आर्ट आहे. सेलोफेन नावाच्या काचेसारख्या दिसणाऱ्या तुकड्यांना नखांवर चिकटवून तडकलेल्या काचेचा आभास निर्माण केला जातो.

'स्ट्रीप्स नेलआर्ट' ज्यांना फार नक्षीकाम आवडत नाही, त्यांना हे ट्राय करता येईल. दोन विरुद्ध रंगाच्या स्ट्रीप्स रंगवून ही नेल आर्ट साकारली जाते.

'फ्लोरल अॅक्रेलिक' हे थोडं हटके नेल आर्ट आहे. मूळ नखांवर एनॅमल लावून ती लांब आणि टोकाला निमुळती केली जातात. त्यावर ब्रशने थ्रीडी इफेक्ट देत फुलापानांची नक्षी रंगवली जाते.
आपली प्रतिक्रिया द्या