1 / 6

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा कोकणाने शिवसेनेला साथ देत शिवसेना आणि कोकण हे नातं अधिक दृढ केले आहे. कोकणात शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकला आहे. आज निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी जल्लोष केला.

वर्षानुवर्ष भाजपच्या ताब्यात असलेली दांडेआडोम ग्रामपंचायतीच्या 9 पैकी 9 जागा जिंकून शिवसेनेचा भगवा फडकला. सर्व विजयी उमेदवारांसह शिवसेना उपनेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, विजयाचे शिल्पकार उपजिल्हाप्रमुख आणि बांधकाम सभापती महेश म्हाप.

रत्नागिरी तालुक्यातील नाखरे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनलने दणदणीत विजय मिळवताच शिवसैनिकांनी भगवामय जल्लोष केला.
आपली प्रतिक्रिया द्या