Photo – केसात गजरा, कानात झुमके हिंदुस्थानी पोशाखात जान्हवी कपूरचा लूक होतोय व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती आपले वेगवेगवेळे फोटो इंस्टावर शेअर करत असते. नुकतेच तिने ट्रेडिशनल लूकमधील फोटो इंस्टावर शेअर केल्याने ती चर्चेत आली आहे. निळ्या रंगाच्या बनारसी साडीत ती खूप सुंदर दिसत असून अनेकांनी तिचे फोटो पाहून श्रीदेवीची आठवण झाल्याचे म्हंटले आहे.  

जान्हवीने केसात गजरा, कानात झुमके, कपाळावर टिकली लावून ती साडीत देखणी दिसत आहे.

जान्हवी तिच्या आगामी मिली या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा तिचे वडिल बोनी कपूर यांनी प्रोड्युस केला आहे.

जान्हवी कपूरचा ‘मिली’ सिनेमा उद्या 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

जान्हवीचे साडीतील हे फोटो तिची आई श्रीदेवीची आठवण करुन देतात.

जान्हवी कपूरने नीळ्या रंगाच्या बनारसी साडी नेसली आहे. त्यावर मॅचिंग स्लीवलेस ब्लाऊजसोबत घातला आहे.

तिच्या फोटोंचे चाहत्यांनी भरभरुन कौतुक करत कॉमेण्ट्चा पाऊस पडला आहे.

चाहत्यांच्या जान्हवीच्या फोटोंवरुन नजरा हटेनाशा झाल्या आहेत.