
हिंदुस्थानचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कश्मीरमध्ये वसंताचं आगमन झालं आहे. बर्फाची चादर हटून आता झाडाझुडपांनी मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. वसंताचा आगमनानंतर झाडांना धुमारे फुटले असून ती ऐन बहरात आली आहेत. त्यामुळे कश्मीरच्या सौंदर्यात भर पडली आहे.