तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. या दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी पार्क येथील स्मारकावर माँसाहेबांना अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच महिला आघाडी, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.