Photo – ऑस्कर सोहळ्यात हिंदुस्थानी पोशाखात दिसले ‘आरआरआर’चे नायक

एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातील राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने इतिहास घडवला आहे. ऑस्कर या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिजात गीत (बेस्ट ओरिजिनल साँग) या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी हजेरी लावली. त्यांनी परदेशी पोशाखाऐवजी हिंदुस्थानी पोशाखांना प्राधान्य दिलं. त्यांच्या या पोशाखांमुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.