Photo – स्वातंत्र्यदिनाचा पंढरपुरात उत्साह; मंदिरात तीन रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट

देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिवस जल्लोषात साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंढरपूरमधील विठ्ठल-रुख्मिणी मातेचे मंदिर तिरंग्यात सजले आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिलात तीन रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

झेंडू, शेवंतीची फुलं आणि पानांचा वापर करून विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार सोळखांबी, नामदेव महाद्वार अशा विविध ठिकाणी मंदिर समितीकडून सजावट करण्यात आली आहे.