IBPS परीक्षा आणि MPSC राज्यसेवा एकत्रित पूर्वपरीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुण्यात आंदोलन सुरू केले होते. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांना ताब्यात घेत रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला.