Photo – पांढऱ्या साडीत शेहनाज गिलची मोहक अदा

पंजाबची कतरिना कैफ अशी ओळख असलेली आणि बिग बॉसच्या तेराव्या सिझनमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शेहनाज गिल. अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत असलेल्या नात्यामुळे देखील ती चर्चेत होती. सिद्धार्थच्या आकस्मिक निधनानंतर ती आता सावरली असून आपल्या कामाकडे वळली आहे. काही दिवसांपूर्वी तिने पांढऱ्या साडीत एक सुंदर फोटोशूट केलं होतं. त्यात तिच्या मोहक अदा पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत.