Photo story – आयपीएलमध्ये एकही चौकार न मारता अर्धशतक ठोकणारे 5 खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पहिल्याच आठवड्यात क्रीडा चाहत्यांना सुपर ओव्हर, जबरदस्त फिल्डिंग, डोंगराएवढ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग असे ‘पैसा वसूल’ क्रिकेट पाहायला मिळाले. रविवारी राजस्थानच्या संघाने पंजाबने दिलेले 223 धावांचे आव्हानही लीलया पार केले. या लढतीत राहुल तेवतिया याने तुफानी खेळी करत अर्धशतक ठोकले. एकाच षटकात 5 षटकार ठोकत त्याने संघासाठी विजयाची कवाडे उघडून दिली. या लढतीत त्याने एकही चौकार न मारता फक्त षटकार ठोकत अर्धशतक केले. जाणून घेऊ आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडुंबाबत…

1. संजू सॅमसन –

images
संजू सॅमसन याने आयपीएल 2017 मध्ये गुजरात लायन्स संघाविरुद्ध 31 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. त्यावेळी तो दिल्लीचे प्रतिनिधित्व करत होता. 208 धावांचा पाठलाग करताना संजूने तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. या खेळीदरम्यान त्याने 7 उत्तुंग षटकार ठोकले होते.

2. डेव्हिड मिलर –

images-1
सध्या राजस्थानच्या संघात असणारा डेव्हिड मिलर 2014 ला पंजाबच्या संघात होता. पंजाबकडून खेळताना त्याने हैद्राबाद संघाविरुद्ध 19 चेंडूत 52 धावा चोपल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने एकही चौकार लगावला नव्हता, मात्र 6 वेळा चेंडूला हवाई मार्गे सीमारेषेपार पोहोचवले होते.

3. नितीश राणा

images-2
2017 ला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना नितीश राणा याने 33 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी केली होती. या दरम्यान त्याने सात वेळा चेंडूला आसमान दाखवले होते. एकही चौकार न लगावत अर्धशतक करत त्याने जोस बटलरच्या साथीने मुंबईला पंजाबविरुद्ध विजय मिळवून दिला होता.

4. संजू सॅमसन –

images-3
2018 ला राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना संजूने 45 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने अर्धशतकापर्यंत एकही चौकार लगावला नव्हता, मात्र 92 त्यानंतर त्याने 2 चौकार ठोकले होते. एकूण 10 षटकार आणि 2 चौकार त्याने ठोकले.

5. राहुल तेवतिया –

images-4
आयपीएलच्या 13 व्या हंगामात राजस्थानचा खेळाडू राहुल तेवतिया याने 31 चेंडूत 53 धावांची अर्धशतकीय खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने 7 षटकारांची आतिषबाजी केली.

आपली प्रतिक्रिया द्या