Photo story – आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 खेळाडू

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कोरोना संकटकाळामुळे प्रेक्षकांविना होणारी ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाजांची माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया कोण आहेत हे खेळाडू…

1. विराट कोहली –

ipl-2019-virat-kohli-angry
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. विराटने आतापर्यंत 177 लढतीत 5,412 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 5 शतकांचा आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. 2016 ला विराटने एकाच हंगामात सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या.

2. सुरेश रैना –

suresh-raina
चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैना या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रैनाने 193 लढतीत 5,368 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये 5 हजार पेक्षा जास्त धावा करणारे विराट आणि रैना हे दोनच खेळाडू आहेत. मात्र यंदा रैना कौटुंबिक कारणामुळे आयपीएलला मुकणार आहे.

IPL 2020 – सनरायझर्स हैद्राबादचा संघ मजबूत, पण ‘हे’ आहे मुख्य आव्हान

3. रोहित शर्मा –

rohit-sharma-ipl
मुंबई इंडियन्सचा 4 वेळा टायटल जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितच्या नावावर 188 लढतीत 4,898 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 36 अर्धशकत ठोकले आहे. यंदा रोहितने आणखी 102 धावा करताच त्याचा विराट आणि रैनाचा क्लबमध्ये समावेश होईल.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज

4. डेव्हिड वॉर्नर

warner

आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर चौथ्या नंबरवर असून त्याने 126 लढतीत 4,706 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 4 शतकांचा आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या वेळी त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती.

5. शिखर धवन –

dhavan-srh0
पाचव्या स्थानावर गब्बर शिखर धवन असून त्याने 159 लढतीत 4,579 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वाधिक स्कोर 97 असून 35 अर्धशतकांची नोंद त्याच्या नावावर आहे.

IPL 2020 – सर्वाधिक धावा, विकेट्स ते सर्वाधिक षटकार; 10 प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

दरम्यान, सहाव्या स्थानावर ख्रिस गेल, एम. धोनी सातव्या स्थानावर, रॉबिन उथप्पा आठव्या, एबी. डिव्हीलिअर्स नवव्या आणि गौतम गंभीर दहाव्या स्थानावर आहे.

बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

आपली प्रतिक्रिया द्या