बोंबला! जेवण दिले नाही म्हणून फोटोग्राफरने लग्नाचे फोटो केले डिलीट

प्रातिनिधिक फोटो

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. या खास क्षणाला आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी फोटोंमध्ये कैद केले जाते. मात्र लग्न होताच एखाद्या फोटोग्राफरने नवविवाहित जोडप्यासमोरच लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले तर? तुम्हाला हे खोटे वाटत असले तरी असा प्रसंग घडला असून यामुळे नवविवाहित जोडपे आणि वऱ्हाड्यांनी डोक्याला हात लावला आहे.

मित्राच्याच लग्नामध्ये फोटो काढण्यासाठी एक फोटोग्राफर गेला होता. मात्र लग्नादरम्यान झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी फोटोग्राफरने जोडप्यासमोरच त्यांचे सर्व फोटो डिलीट केले. तसेच नाराजी दर्शवत तिथून निघूनही गेला. फोटोग्राफरने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत सोशल मीडिया साईट Reddit वर माहिती देण्यात आली आहे. त्या दिवशी नक्की काय घडले हे फोटोग्राफरने सांगितले.

आपण एक व्यवसायिक फोटोग्राफर नसून कुत्र्यांची देखभार करणे आपले काम आहे. याच कुत्र्यांचे फोटो काढून ते फेसबुक आणि इन्टाग्रामवर अपलोड करत होतो. परंतु माझ्या मित्राच्या लग्नाचे बजेट कमी असल्याने मला फोटो काढण्यासाठी बोलावण्यात आले. मी नकार दिला, तरी जबरदस्तीने त्याने मला नेले. 250 डॉलर (जवळपास 18 हजार रुपये) मध्ये हा सौदा झाला होता.

लग्नाच्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत फोटो काढण्याचे काम होते. यादरम्यान सायंकाळी 5 वाजता जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. दिवसभर फोटो काढून थकल्यामुळे फोटोग्राफर जेवणाला बसला, मात्र त्याला जेवण करु दिले गेले नाही. यानंतर फोटोग्राफर मित्राकडे गेला आणि जेवणासाठी 20 मिनिटांचा ब्रेक घेत असल्याचे सांगितले. मात्र मित्रानेही नकार दिला आणि एकतर फोटो काढ नाहीतर घरी निघून जा असा उर्मठपणे बोलला. नवरदेवाने केलेल्या अपमानामुळे फोटोग्राफर भडकला आणि त्याने नवविवाहित जोडप्यासमोर लग्नात काढलेले सर्व फोटो डिलीट केले आणि घरी निघून गेला.

आपली प्रतिक्रिया द्या