Photo – 2 वर्ष एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री पुन्हा मालिकेकडे वळली

मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रार्थना बेहेरे लवकरच आपल्याला मालिकेमधून दिसणार आहे. 

197437896_305563834606916_7634792703372231206_n

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हिंदी व मराठी मालिका, चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही तब्बल 11 वर्षांनंतर मालिकांमध्ये कमबॅक करतेय.

188476828_488078319064368_6691984225629493078_n

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

188933627_345270467024164_6113976420065972351_n

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 ‘मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. परंतु, आता जवळपास दोन वर्ष माझा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मला चाहते वारंवार एकच प्रश्न विचारताय की तुमचा पुढचा चित्रपट कधी येणार. त्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी कुठे गायब आहे,’ असे प्रार्थना सांगते.

 

177006936_166641775250017_7275546483374852238_n

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यावरून मला एक कळालं, चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. परंतु, जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला.’ असेही प्रार्थनाने सांगितले.

174267764_830630664192189_612091346985047838_n

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मालिकेत प्रार्थनासोबत लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. 23 ऑगस्टपासून मालिका भेटीला येणार आहे.

 

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या