Photo – रिचा व अलीच्या लग्नविधींना सुरुवात, पाहा त्यांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो

हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक जोडपं लग्नबंधनात अडकत आहे. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाची तारिख दोन दिवसांवर येऊन ठेपली असून त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. रिचा व अलीचा मेहेंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याचे फोटो रिचाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.