Photo – शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर रोषणाई, पाहा मनमोहक दृश्य सामना ऑनलाईन | 18 Feb 2021, 6:36 pm Facebook Twitter 1 / 6 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगड रोषणाईने उजळून गेला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे पुरातत्त्व विभागाकडे स्वराज्याची राजधानी रायगडावर विद्युत रोषणाई करण्याकरिता विनंती करण्यात आली होती. या विनंतीला पुरातत्त्व विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रायगडावर विद्युत रोषणाई करण्यात आली. रायगडचा सारा परिसर उजळून निघाला. आपली प्रतिक्रिया द्या