Photo ‘हे’ आहेत जगातील पाच सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, तीन आहे हिंदुस्थानी

क्रिकेटमधील कमाई तर आता लपून राहिलेली नाही. आयपीएलसारख्या स्पर्धांमधून क्रिकेटपटू हल्ली कोट्यवधींची कमाई करत असतात. यात हिंदु्स्थानातल्या क्रिकेटपटूंची कमाई ही कायमच चांगली राहिलेली आहे. त्यामुळेच जगातील पाच सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये तीन क्रिकेटपटू हे हिंदुस्थानातील आहेत.

सचिन तेंडुलकर –

सचिन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत क्रिकेटचे मैदान गाजवले. त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. सचिन 2013 साली निवृत्त जरी झाला असला तरी गेल्या 9 वर्षात त्याने जाहीराती व गुंतवणूकीच्या माध्यमातून अफाट पैसा कमावला आहे. सचिन देश विदेशी अनेक ब्रँड्सचा अँबेसिडर आहे. सध्या सचिन तेंडुलकरकडे 170 मिलियन डॉलर संपत्ती आहे.

विराट कोहली –


-टीम इंडियाचा माजी कर्णधार हा श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीकडे सध्या 127 मिलियन डॉलर संपत्ती आहे. त्याला बीसीसीआयकडून दरवर्षी A+ कॉन्ट्रॅक्टसाठी 7 कोटी मिळतात. आईपीएल, जाहीराती यातूनही तो कोट्यवधी रुपये कमावतो.

महेंद्र सिंह धोनी –

 धोनीने निवृत्ती घेऊन दोन वर्ष झाली. मात्र जाहीराती व आईपीएलमध्ये त्याचा डंका अजूनही वाजतोय. धोनीकडे सध्या 113 मिलियन डॉलर संपत्ती आहे. धोनीकडे जाहीरातीमध्ये हिंदुस्थानातील अनेक आघाडीचे ब्रँड्स आहेत. तसेच त्याचे एक फिल्म प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

रिकी पॉईंटिंग –

ऑस्ट्रेलियाला दोन वेळा वर्ल्ड कप मिळवून देणारा कर्णधार रिकी पॉईटिंग हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. रिकीकडे सध्या 95 मिलियन डॉलर संपत्ती आहे. त्याच्याकडे एडिडास, प्यूमा, रेक्सोना, वाल्वोलिन, कूकाबुरा बैट्स असे अनेक मोठ्या ब्रँड्सचा तो अँम्बेसिडर आहे.

ब्रायन लारा –

 वेस्ट इंडिजच्या महान फलंदाजांपैकी ब्रायन लारा एक आहे. टेस्ट सामन्यात एका इनिंगमध्ये 400 धावा करण्याचा त्याचा रेकॉर्ड अद्याप कुणी तोडू शकलेला नाही. ब्रायनने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्ष झाली मात्र तो कॉमेंट्री व जाहीरातीतून बक्कळ पैसा कमवत आहे. त्याच्याकडे सध्या 68 मिलियन डॉलर संपत्ती आहे.